Monday, July 7, 2025

saman arthache shabd online test समानार्थी शब्द सराव चाचणी

समानार्थी शब्द सराव चाचणी



saman arthache shabd online testsaman arthache shabd online test







  




saman arthache shabd online test

    आपल्या मराठी म्हणजेच बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात आजपर्यंत आलेले समान अर्थाचे शब्द आपण अभ्यासलेले आहेत. या शब्दांचा संग्रह आपल्याकडे आहेच. समान अर्थाचे शब्द या घटकावर आपल प्रभुत्व असणं गरजेच आहे. समान अर्थाचे शब्द हा घटक खूप विस्तारित आहे. या घटकाच्या तयारीसाठी आपली शब्द संपत्ती जास्त असणे गरजेचे आहे.

समानार्थी शब्द म्हणजे काय ?

     एखाद्या वस्तूसाठी एक विशेष नाव असते. आपणास ते नाव सांगितलं की लगेच ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते. उदा. पाणी - पाणी या शब्दाला दुसरा शब्द जल आहे. त्याचबरोबर जीवन , नीर. उदक , सलिल , अंबू , तोय इत्यादी शब्द आहेत. या इतर शब्दाला समानार्थी शब्द असे म्हणतात.



    प्रज्ञाशोध परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्ष्मध्ये समानार्थी शब्दावर प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सराव झाला की आपणास या घटकावरील प्रश्न सोडवण्यास सोपे जाईल.

    समानार्थी शब्द या घटकावर आधारित खाली दिलेली सराव चाचणी सोडवा.




Vegla Shabd Olkha [visangat ghatak olkha ] वेगळा शब्द ओळखा.

Vegla Shabd Olakha [visangat ghatak olkha ] 



 वेगळा शब्द ओळखा.


 वेगळा शब्द ओळखा.

 वेगळा शब्द ओळखा.

    वेगळा शब्द ओळखा किंवा गटात न बसणारा शब्द ओळखा असा प्रश्न असतो. या प्रश्न प्रकारात चार पर्याय दिले जातात. त्यात आपणास विचार करून त्या शब्दांचे परस्पर संबध काय आहेत, हे जाणून घ्यावे लागतात. तर्क लावून त्या शब्दातील साम्य असलेले शब्द कोणते आहेत, हे शोधता आले पाहिजे.


Vegla Shabd Olkha

     दिलेल्या गटातील चार पर्यायांपैकी तीन पर्यायांमध्ये एका बाबतीत साम्य असते. ते आपण समजून घेऊन प्रश्नाचे अचूक उत्तर शोधले पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला शब्दसंग्रह जास्त असणे आवश्यक आहे.

    हा घटक सोडवण्यासाठी आपली तयारी जास्त असणे अपेक्षित आहे. खालील सराव टेस्ट आपणास उपयुक ठरेल. टेस्ट सोडवा, जे पर्याय चुकले असतील, त्या पर्यायाचे स्पष्टीकरण आपणास देण्यात आलेले आहे. एक उत्कृष्ट सराव टेस्ट आपणास सोडवण्यासाठी मिळणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सराव टेस्ट सोडवू.




Pet Animals पाळीव प्राणी [ Paliv Prani In English ]

Pet Animals [ Paliv Prani ] पाळीव प्राणी


Pet Animals 

    ज्या प्राण्यांचा आपणास दैनंदिन जीवनात उपयोग होत असतो, असे प्राणी आपण आपल्या घरामध्ये पाळतो. अशा प्राण्यांना आपण पाळीव प्राणी असे म्हणतो.प्रत्येक प्राण्यांचा आपणास काही न काही तरी उपयोग हा होतोच.

Paliv Prani Konate 

    शेतात काम करण्यासाठी शेतकऱ्याला बैलांचा खूप उपयोग होतो. गाय, म्हैस, शेळी, उंट हे प्राणी दूध देतात. कुत्रा आपल्या घराची राखण करतो. गाढव ओझे वाहण्यासाठी कामाला येतो. असे आणखी बरेच प्राणी आहेत जे आपण आपल्या कामासाठी घरी पाळतो. या प्राण्यांना पाळीव प्राणी असे म्हणतात. 

Per Animals



Paliv Prani in english 

    अशा पाळीव प्राण्यांना इंग्रजीमध्ये Pet Animals [ पेट अॅनिमल्स ] असे म्हणतात. या घटकावर येणाऱ्या प्रश्नाचा आपणास सराव होणे गरजेचे आहे. 

    प्रज्ञाशोध परीक्षा तसेच वेगवेगळ्या शिष्यवृत्ती परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जातात. या घटकावर आधारित खालील सराव टेस्ट सोडवा.

Shapes Online Test [आकारांची नावे इंग्रजीमधून ]

Shapes Online Test [ aakaranchi naave english ] 


 [आकारांची नावे इंग्रजीमधून ]


Shapes Online Test

Shapes in English


    आपण गणित या विषयामध्ये वर्तुळ, चौकोन, आयत, त्रिकोण इत्यादी आकार अभ्यासलो आहोत. हे आकार आपणास माहित आहेत. या आकारांना भौमितिक आकार असे म्हणतात.
 

Bhoumitik Akrutya 

     भौमितिक आकारांना इंग्रजी मध्ये Shapes असे म्हणतात. त्यामध्ये Circle, Hexagon, Square, Con, Cube etc असे म्हणतात. असे बरेच आकार आहेत. या आकारांची ओळख आपणास असणे गरजेचे आहे. आपण ज्या स्पर्धा परीक्षा देतो, त्यामध्ये यावर प्रश्न विचारले जातात. 

    हे प्रश्न अचूक सोडवले तर आपणास या प्रश्नाचे गुण मिळतात. या आकारांचा आपणास सराव झाला, तरच हे प्रश्न आपणास सोडवण्यास सोपे जाणार आहेत. Shapes या घटकावरील सराव टेस्ट सोडवून आपण आपला हा घटक आणखीन परफेक्ट करूयात.

    चला तर मग आपण खालील टेस्ट सोडवू.
    

Colours Name रंगांची नावे

Colours Name 

Colours_Name
Colours Name 


 रंगांची नावे ( इंग्रजी )

    आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे रंग पाहतो. या रंगांची मराठी मधून आपणास नवे माहित आहेत.पण या रंगाना इंग्रजीमध्ये कोणती नवे आहेत, आणि त्या नावांचे अचूक स्पेलिंग काय आहे, हे माहित असणे गरजेचे आहे.

Colours Name

आपण काही रंगांची नावे इंग्रजीमधून पाहू.
१. Black - ब्लॅक - काळा
२. Green - ग्रीन - हिरवा 
३. Blue - ब्ल्यू - निळा 
असे आणखी बरेच रंग आहेत. 

    इंग्रजी रंगांची नावे या घटकावर आपणास परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची अचूक उत्तरे येण्यासाठी आपणास रंगांची नावे [ Colours Name ] पाठांतर असणे गरजेचे आहेत.

    चला तर मग आपण या Colours Name  म्हणजेच इंग्रजीमधून असणारी रंगांची नावे या घटकावरील सराव टेस्ट सोडवू . 

 

Saturday, July 5, 2025

Marathi Mhani pdf मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ 



 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ



 Marathi Mhani pdf

    मरठी भाषा बोलतेवेळी तसेच लेखन करतेवेळी त्या भाषेला एक सौंदर्य प्राप्त व्हावे यासाठी या भाषेमध्ये म्हणींचा वापर केला जातो. आपण सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देतेवेळी या घटकावर हमखास प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचे गुण मिळवण्यासाठी आपणास या मराठी म्हणी पाठांतर असणे आवश्यक आहे.


मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

    इयत्ता तिसरीपासून ते आठवी पर्यंत सर्व प्रकारच्या परीक्षा म्हणजेच, प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा त्याच बरोबर नौकर भरती परीक्षा या सर्व परीक्षेत या घटकावर प्रश्न येतात.

Marathi Mhani aani tyanche aath 

     या घटकाचा अधिकचा सराव असणे गरजेचे आहे. आपला जास्तीचा सराव व्हावा यासाठी आपणास खालील PDF खूप उपयुक्त ठरणार आहे. या pdf मध्ये भरपूर मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. 

    दिलेली pdf आपण डाऊनलोड करून ती आपल्या संग्रही ठेवावी. आपण आपल्या विद्यार्थ्यांना ही pdf देऊन याचा पाठांतरासाठी उपयोग करून घेऊ शकतो.   


मराठी म्हणी pdf डाऊनलोड करा.

maratha sardar bhosalyanche kartabgar gharane ३. मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे

३. मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे 


३. मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे
 Maratha Sardar Bhosalyanche Kartabgar Gharane



 Maratha Sardar Bhosalyanche Kartabgar Gharane

    शिवरायांपूर्वी महाराष्ट्रात आदिलशाहा व निजामशाहा या सुलतानांची सत्ता होती. त्यांच्यात नेहमी लढाया होत. या लढायांत ते मराठे सरदारांचा उपयोग करून घेत. या सुलतानांच्या पदरी जे मोठे मराठी सरदार होते, त्यांमध्ये सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे व वेरुळचे भोसले हे प्रमुख होते.

मालोजीराजे भोसले

    बाबाजीराजे भोसले हे शिवरायांचे पूर्वज वेरुळचे पाटील होते. त्यांचे पुत्र मालोजीराजे हे शिवभक्त होते. मालोजीराजांनी वेरूळ जवळील घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले.

शहाजी राजे 

    शहाजीराजांचा विवाह लखुजीराव जाधव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाला. मुघलांपासून निजामशाहीला वाचवण्यासाठी शहाजीराजे यांनी भातवडीची लढाई निकराने लढले.


    या पाठावरील सराव टेस्ट सोडवून आपला या घटकाच अधिकचा सराव करू. खालील सराव टेस्ट सोडवून गुण तपासून पाहा.

       

santanchi kamgiri २.संतांची कामगिरी

२.संतांची कामगिरी 


संतांची_कामगिरी
 santanchi kamgiri



 santanchi kamgiri


    महाराष्ट्रात समाजाच्या विविध स्तरांमध्ये अनेक संत होऊन गेले. यात जनाबाई, सोयराबाई, निर्मलाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई या स्त्री संतांचाही सामावेश होतो. या सर्वच संतांनी लोकांनी दया, अहिंसा, समभाव, सेवा यांची शिकवण दिली.

महाराष्ट्रातील संत 

     महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यात  श्रीचक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत शेख महंमद, संत तुकाराम, संत निळोबा या संतांचा अंतर्भाव आहे. 

संतांचे उपदेश व कार्य 

    महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांनी लोकांना अहिंसा, परोपकार, बंधुभाव, समता, सेवा या गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकाच्या मनात निर्माण केली.


    साधुसंतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला.


या पाठावरील महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

पाठातील महत्वाच्या प्रश्न आणि उत्तरांचा व्हिडीओ येथे पाहा.



   

shiv janma purvicha maharashtra swadhyay १. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

१. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र 


 shiv janma purvicha maharashtra

    शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने साजरी करतो.पोवाडे म्हणतो, त्यांच्या तसबिरीला हार घालतो. मोठ्या उत्साहाने 'शिवाजी महाराज की जय' असा जयजयकार करतो.





शिवजन्मापूर्वीचा_महाराष्ट्र

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र



शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र 

    शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले, तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळात असे काही राजे होऊन गेले, की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले.
 

    या कल्याणकारी राजांच्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मोठ्या गौरवाने घेतले जाते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य होय. स्वराज्यात कसलाही भेदभाव नव्हता. 


    हे आपण या पाठामध्ये अभ्यासलो आहोत. या पाठावरील सराव चाचणी आपण सोडवू . खालील सराव चाचणी सोडवा आणि आपले गुण तपासा.

    

Wednesday, July 2, 2025

roman numbers रोमन संख्याचिन्हे

roman numbers 

रोमन_संख्याचिंन्ह

रोमन संख्याचिन्हे 


रोमन सांख्याचिन्हे

    आपण अंगणवाडीपासून ते आजपर्यंत संख्या वाचन शिकलो आहोत. आपण संख्या या तीन प्रकारे लेखक लेखन करतो. त्यात देवनागरी, आंतराष्ट्रीय आणि रोमन संखाचिन्ह या प्रकारात आपण संख्या लेखन करतो.

 roman numbers

     रोमन संख्याचिन्ह लेखन करण्यासाठी आपणास इंग्रजांच्या अक्षरांचा वापर केला जातो. काही इंग्रजी अक्षरे वापरून रोमन संख्या लेखन केल्या जातात. 

     रोमन संख्या या घटकावर आपणास स्पर्धा परीक्षेमध्ये तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. या घटकाचा आपला सराव व्हावा. या उद्देशाने ही सराव टेस्ट तयार केळी आहे. याचा आपणास नक्कीच फायदा होईल. चला तर मग सराव टेस्ट सोडवू.


    

visangat ghatak विसंगत घटक शोधणे.

Visangat Ghatak 


विसंगत_घटक

विसंगत घटक शोधणे.

विसंगत घटक म्हणजे काय ?

प्रज्ञाशोध परीक्षा तसेच सर्व स्पर्धा परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जातात. एका प्रश्नामध्ये आपणास चार पर्याय दिलेले असतात. त्या चार पर्यायाचा सर्व बाजूने विचार करून त्यातील साम्य काय आहे याचा अंदाज आपणास बांधावा लागतो.चार पर्याय्तील एक पर्याय त्या गटात बसत नाही. तो पर्याय अचूकपणे शोधून काढणे म्हणजे विसंगत घटक ओळखणे होय.

Visangat Ghatak

    या घटकाचा आपणास जास्त सराव असणे आवश्यक आहे. या घटकावर आपणास परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. या घटकाची तयारी परिपूर्ण होण्यासाठी आपले अवांतर वाचन जास्त वेळ असले पाहिजे.

    आपला या घटकाचा सराव व्हावा यासाठी खालील सराव टेस्ट आपणास खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग सराव टेस्ट सोडवू आणि आपला स्कोर पण पाहू.



 

visangat ghatak olkha in marathi विसंगत असणारा घटक ओळखा.

विसंगत असणारा घटक ओळखा. 


विसंगत_घटक_ओळखा

विसंगत असणारा घटक ओळखा.





 visangat ghatak olkha in marathi

    प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय परीक्षेसाठी महत्वाचा असणारा घटक म्हणजे; दिलेल्या पर्यायातील विसंगत घटक कोणता ते शोधणे.  या प्रश्न प्रकारामध्ये संख्या, फळांची नावे, प्राण्यांची नावे, शहारांची नावे, देशांची नावे, महिने आशा अनेक प्रकारचे शब्दांचा समावेश केला जातो. 

विसंगत असणारा घटक ओळखा.

     दिलेले पर्याय पाहून ते समजून घेऊन त्यातील तीन पर्यायात काय साम्य आहे हे आपण शोधले पाहिजे. यातील तीन पर्यायात साम्य असते आणि त्यातील एक पर्याय हा वेगळा असतो. जो पर्याय वेगळा आहे, तो अचूक शोधून त्याचा पर्याय क्रमांक आपणास शोधायचा असतो. यासाठी आपला शब्दसंग्रह खूप असणे गरजेचे आहे.

    चला तर मग या घटकावरील ही उपयुक्त सराव टेस्ट आपण सोडवू . उत्तम सरावासाठी या टेस्ट आपणास खूप उपयोगी आहेत.


  
 

sathavan panyachi swadhyay ३. साठवण पाण्याची

३. साठवण पाण्याची


साठवण_पाण्याची

३. साठवण पाण्याची


पाण्याची साठवण :- 

    पावसापासून मिळणारे काही पाणी जमिनीवरून वाहून जाते.काही पाणी जमिनीमध्ये मुरते. आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते. पावसाळा तीन ते चार महिने असतो. आपल्यासह सर्व सजीव वर्षभर हे पाणी वापरतात. 

 



पाणी साठवण्याच्या पद्धती :-

पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याया पुरेसे पाणी मिळणार नाही, म्हणून पाणी साठवावे लागते. पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागतो. पाणी साठवण्याच्या पद्धती आपण पाहू .

sathavan panyachi 

पाणी साठवण्यासाठी विहीर, किल्ल्यांवराचे तलाव तलाव व टाक्या, आड, नदी व बंधारे, जुने तलाव, जुने हौद, धारण, विंधन विहिरी हे पाणी साठण्याचे साठे आहेत.





Friday, June 27, 2025

sajivanche parasparanshi nate in marathi २. सजीवांचे परस्परांशी नाते

२. सजीवांचे परस्परांशी नाते


सजीवांचे परस्पराशी नाते
 २. सजीवांचे परस्परांशी नाते 

सजीवांच्या गरजा कोणत्या ?

    सजीवांच्या निरनिराळ्या गरजा आहेत. त्यात अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा या आपल्या प्रमुख गरजा आहेत. त्याचबरोबर अशा आपल्या अनेक गरजा आहेत त्या परिसरातूनच पूर्ण होतात. 

  सजीवांचे परस्परांशी नाते -

    प्रत्येक सजीव हा आल्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. आपण आपलेच उदाहरण घेतले तर आपल्या अनेक गरजा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आपण परिसरातील साधनांचा उपयोग करून घेतो. आपणास अन्नाची गरज आहे, त्यासाठीआपण शेतीतून धान्य पिकवून त्यापासून आपली अन्नाची गरज पूर्ण करतो. परिसरातील पाण्याच्या साठ्यापासून आपली पाण्याची गरज भागते. परीसाराथिल साधनांचा वापर करून आपण घर म्हणजेच आपल्यासाठी निवारा तयार करतो.
    म्हणजेच आपण आपल्या गरजांसाठी परिसरावर अवलंबून आहे. 

sajivanche parasparanshi nate in marathi


    त्याचबरोबर इतर सजीव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. वाघ हा प्राणी गवताल प्रदेशात राहतो. वाघाला भूक लागली, की तो हरणे, नीलगाई, गवे असे इतर प्राणी खातो.जंगलातील पाणवठ्यावर पाणी पितो. वाघ घनदाट झाडी, उंच गावात किंवा डोंगरातील गुहा यामध्ये आसरा घेतो.

        सजीवांचे परस्परांशी एक अतूट आणि घनिष्ठ नाते आहे.

pranyancha jivan kram १. प्राण्यांचा जीवनक्रम

इयत्ता चौथी  १. प्राण्यांचा जीवनक्रम 

प्राण्यांचा_जीवनक्रम
१. प्राण्यांचा जीवनक्रम 

प्राण्यांचा जीवनक्रम म्हणजे काय ?

    आपण दैनंदिन जीवनात आपल्या परिसरात अनेक प्राणी पाहतो. यातील बरेच प्राणी हे आपणास वेगवेगळ्या कामासाठी उपयोगात येत असतात. आपण आपल्या उपयोगासाठी शेळी, गाय, म्हैस, घोडा, बैल, गाढव, कुत्रा असे आणिक पाणी सांभाळतो. या प्राण्यांची होणारी शारीरिक वाढ आपणास समजते.प्राण्यांमध्ये होणारे बदल यालाच प्राण्यांचा जीवनक्रम म्हणतात.

 


pranyancha jivan kram

    आपल्या घरातील प्राण्याची जन्माला आल्यापासून होणारी वाढ आपण पाहतो.शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्यात जास्त असा फरक नसतो. प्राणी अंडी घालत नाहीत. प्राण्यांची पिल्ले आईच्या पोटातून जन्म घेतात. पण काही प्राणी असे अआहेत की ते अंडी घालतात. उदा. कोळी, सरडा....

 रूपांतरण म्हणजे काय ?

    शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे; पण फुलपाखराची आली आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक असतो.
पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेले प्राणी यांच्या रुपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे, याला रूपांतरण असे म्हणतात.

    सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परीसाराचाच एक हिस्सा असतात. त्यांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते.
     फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ अशा या चार अवस्था असतात. त्यांतल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू असे म्हणतो. आपल्या भागात बिबळ्या कडवा या जातीचे फुलपाखरू मोठ्या प्रमाणात आढळते.



saman arthache shabd online test समानार्थी शब्द सराव चाचणी

समानार्थी शब्द सराव चाचणी saman arthache shabd online test saman arthache shabd online test    saman arthache shabd online test      आपल्या...