इयत्ता चौथी १. प्राण्यांचा जीवनक्रम
![]() |
| १. प्राण्यांचा जीवनक्रम |
प्राण्यांचा जीवनक्रम म्हणजे काय ?
आपण दैनंदिन जीवनात आपल्या परिसरात अनेक प्राणी पाहतो. यातील बरेच प्राणी हे आपणास वेगवेगळ्या कामासाठी उपयोगात येत असतात. आपण आपल्या उपयोगासाठी शेळी, गाय, म्हैस, घोडा, बैल, गाढव, कुत्रा असे आणिक पाणी सांभाळतो. या प्राण्यांची होणारी शारीरिक वाढ आपणास समजते.प्राण्यांमध्ये होणारे बदल यालाच प्राण्यांचा जीवनक्रम म्हणतात.pranyancha jivan kram
रूपांतरण म्हणजे काय ?
सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परीसाराचाच एक हिस्सा असतात. त्यांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते.
फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ अशा या चार अवस्था असतात. त्यांतल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू असे म्हणतो. आपल्या भागात बिबळ्या कडवा या जातीचे फुलपाखरू मोठ्या प्रमाणात आढळते.

No comments:
Post a Comment