क्रियापद मराठी व्याकरण
kriyapad in marathi / vyakaran marathi
क्रियापद म्हणजे काय ?
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या वाक्यातील क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
बहुतेकवेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येत असते. काही वाक्यामध्ये क्रियापद हे वाक्याच्या मध्येही येऊ शकते.
खालील उदाहरणे पाहू.
१. मी चित्र काढतो.
वरील वाक्यात काढतो या शब्दाचा विचार केला, तर या वाक्यात चित्र काढण्याची क्रिया आहे, हे आपणास समजते.
२. मी अभ्यास करतो.
वरील वाक्यात करतो या शब्दाचा विचार केला, तर या वाक्यात अभ्यास करण्याची क्रिया आहे, हे आपणास समजते.
३. मी क्रिकेट खेळतो.
वरील वाक्यात खेळतो या शब्दाचा विचार केला, तर या वाक्यात क्रिकेट खेळण्याची क्रिया आहे, हे आपणास समजते.
यावरून ' काढतो, करतो, खेळतो' हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत. तसेच वाक्याचा आर्थ पूर्ण करणारे शब्द आहेत. म्हणून 'काढतो, करतो, खेळतो' या वाक्याला क्रियापद असे म्हणतात.
प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षा तयारी करण्यासाठी क्रियापद या घटकावरील खाली दिलेली सराव टेस्ट सोडवा.

No comments:
Post a Comment