Thursday, June 5, 2025

sankhyacha lahan mothepana / संख्यांचा लहान - मोठेपणा

sankhyacha lahan mothepana 


संख्यांचा लहान - मोठेपणा


    संख्यांचा लहान - मोठेपणा ठरवतेवेळी संख्या एक अंकी, दोन अंकी असतील तर ते सोपे जाते. पण संख्या तीन अंकी किंवा त्यापेक्षा मोठ्या असतील तर मात्र थोडे विचार करावे लागते. 


    दोन्ही संख्यामध्ये एक संख्या दोन अंकी आणि दुसरी संख्या तीन अंकी असेल तर तीन अंकी संख्या मोठी हे नक्की आहे. दोन्ही संख्या या तीन अंकी असतील, तर तेव्हा मात्र लहान आणि मोठी संख्या ठरवण्याठी पुढील पद्धत वापरावी लागेल.

sankhyacha lahan mothepana



१. संख्या तीन अंकी असतील, तर ज्या संख्येतील शतक स्थानावरील अंक मोठा असतो ती संख्या मोठी असते.

२. दोन्ही संख्येतील शतक समान असतील तर, ज्या संख्येतील दशक मोठा ती संख्या मोठी असते.

३. दोन्ही संख्येतील शतक आणि दशक स्थानावरील अंक समान असतील तेव्हा ज्या संख्येतील एकक स्थानाचा अंक मोठा असतो, ती संख्या मोठी असते.

    याप्रमाणे संख्येतील अंकाचे निरीक्षण करून संख्येतील लहान - मोठेपणा (sankhyacha lahan mothepana) ठरवता येतो.


या घटकावर आधरित खालील सराव टेस्ट सोडवा.
 

No comments:

Post a Comment

saman arthache shabd online test समानार्थी शब्द सराव चाचणी

समानार्थी शब्द सराव चाचणी saman arthache shabd online test saman arthache shabd online test    saman arthache shabd online test      आपल्या...