वचन मराठी व्याकरण
Vachan marathi grammar
वचन म्हणजे काय ?
खालील अधोरेखित शब्द पहा.
एक नदी - अनेक नद्या
एक पिशवी - अनेक पिशव्या
एक पुस्तक - अनेक पुस्तके
एक आंबा - अनेक आंबे
वरील अधोरेखित नामामध्ये 'नदी, पुस्तक, पिशवी, आंबा' या नामावरून एका वस्तूचा बोध होतो, तर 'नद्या, पुस्तके, पिशव्या, आंबे' या नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो.
"ज्या नामावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत हे कळते, त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात."
मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत.
१. एकवचन २. अनेकवचन
१. एकवचन :- नामावरून एकाच वस्तूचा बोध झाला, तर त्याला त्या नामाचे एकवचन म्हणतात.
२. एकवचन :- नामावरून अनेक वस्तूचा बोध झाला, तर त्याला त्या नामाचे अनेकवचन म्हणतात.
वचन या घटकावर खाली सराव टेस्ट दिलेली आहे. प्रज्ञाशोध परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या सराव टेस्टचा उपयोग नक्कीच होईल.

No comments:
Post a Comment