Thursday, June 5, 2025

lahan sankhya mothi sankhya / लहान संख्या आणि मोठी संख्या

lahan sankhya mothi sankhya 


लहान संख्या आणि मोठी संख्या


lahan sankhya mothi sankhya


 आपण ज्या संख्यांचे वाचन आणि लेखन करतो, त्या संख्याचा लहान - मोठेपणा आपणास ठरवता आला पाहिजे. 

    दिलेल्या संख्या पाहून त्यातील लहान - मोठी संख्या असे वर्गीकरण करता आले पाहिजे. दिलेल्या संख्येतील लहान - मोठेपणा दाखवण्यासाठी विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो. लहान संख्या आणि मोठी संख्या < , > या चिन्हाचा वापर करून ठरवली जाते. 


आपण या चिन्हाचा वापर करून उदाहरण पाहू.


     १२ , ३२ या दोन संख्या आपण घेतल्या आहेत. या संखेतीला १२ ही संख्या लहान आहे. ३२ ही संख्या १२ पेक्षा मोठी आहे. हेच आपण चिन्हाचा उपयोग करून कसे लिहायचे ते पाहू.


१२ < ३२ 

    वरील उदाहरणात १२ ही संख्या ३२ पेक्षा लहान आहे. चिन्हाचा वापर करतेवेळी जी संख्या लहान आहे त्या संख्येकडे चिन्हाच्या दोन रेषा एकत्र जुळलेली बाजू करावी आणि जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडे चिन्हाचे उघडे असलेले म्हणजेच मोठे तोंड करावे.


    याचे वाचन करतेवेळी ते पुढीलप्रमाणे करावे. १२ < ३२ म्हणजेच १२ लहान ३२ पेक्षा (बारा लहान बत्तीस पेक्षा) 


३२ > १२ 


    वरील उदाहरणात ३२ ही संख्या १२ पेक्षा मोठी आहे. चिन्हाचा वापर करतेवेळी जी संख्या लहान आहे त्या संख्येकडे चिन्हाच्या दोन रेषा एकत्र जुळलेली बाजू करावी. आणि जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडे चिन्हाचे उघडे असलेले म्हणजेच मोठे तोंड करावे.


    याचे वाचन करतेवेळी ते पुढीलप्रमाणे करावे. ३२ > १२ म्हणजेच ३२ मोठे १२ पेक्षा (बत्तीस मोठे बारा पेक्षा) 


 lahan sankhya mothi sankhya


 

No comments:

Post a Comment

saman arthache shabd online test समानार्थी शब्द सराव चाचणी

समानार्थी शब्द सराव चाचणी saman arthache shabd online test saman arthache shabd online test    saman arthache shabd online test      आपल्या...