भौमितिक आकृत्या - कोन
bhaumitik aakar online test
भौमितिक आकृत्या - गणित या विषयातील महत्वाचा घटक म्हणजे भौमितिक आकृत्या हा पण आहे. आपण भौमितिक आकारांची ओळख या आधी करून घेतली आहे. भौमितिक आकृत्यांमध्ये कोन हा घटक आपण शिकलो आहोत. कोनाचे मुख्य तीन प्रकार आपण अभ्यासले आहेत. त्यामध्ये विशालकोन, काटकोन आणि लघुकोन असे तीन प्रकार आहेत.
![]() |
bhaumitik aakar |
१. विशालकोन :- विशाल कोन कोणत्या कोनाला म्हणतात ?
'ज्या कोनाचे माप हे ९० अंशापेक्षा जास्त असते, त्या कोनाला विशालकोन असे म्हणतात.'
२. काटकोन :- काटकोन कोणत्या कोनाला म्हणतात ?
'ज्या कोनाचे माप हे ९० अंश असते, त्या कोनाला काटकोन असे म्हणतात.'
३. लघुकोन :- लघुकोन कोणत्या कोनाला म्हणतात ?
'ज्या कोनाचे माप हे ९० अंश पेक्षा कमी असते, त्या कोनाला लघुकोन असे म्हणतात.'
वरील प्रमाणे कोन व कोनाचे प्रकार आहेत. या घटकावर आधारित ऑनलाईन सराव टेस्ट खाली दिलेली आहे.

No comments:
Post a Comment