Pet Animals [ Paliv Prani ] पाळीव प्राणी
Pet Animals
ज्या प्राण्यांचा आपणास दैनंदिन जीवनात उपयोग होत असतो, असे प्राणी आपण आपल्या घरामध्ये पाळतो. अशा प्राण्यांना आपण पाळीव प्राणी असे म्हणतो.प्रत्येक प्राण्यांचा आपणास काही न काही तरी उपयोग हा होतोच.
Paliv Prani Konate
शेतात काम करण्यासाठी शेतकऱ्याला बैलांचा खूप उपयोग होतो. गाय, म्हैस, शेळी, उंट हे प्राणी दूध देतात. कुत्रा आपल्या घराची राखण करतो. गाढव ओझे वाहण्यासाठी कामाला येतो. असे आणखी बरेच प्राणी आहेत जे आपण आपल्या कामासाठी घरी पाळतो. या प्राण्यांना पाळीव प्राणी असे म्हणतात.
Paliv Prani in english
अशा पाळीव प्राण्यांना इंग्रजीमध्ये Pet Animals [ पेट अॅनिमल्स ] असे म्हणतात. या घटकावर येणाऱ्या प्रश्नाचा आपणास सराव होणे गरजेचे आहे.
प्रज्ञाशोध परीक्षा तसेच वेगवेगळ्या शिष्यवृत्ती परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जातात. या घटकावर आधारित खालील सराव टेस्ट सोडवा.

No comments:
Post a Comment