Wednesday, May 28, 2025

Dhvani Darshak Shabd / ध्वनिदर्शक शब्द

ध्वनिदर्शक शब्द 

Dhvani Darshak Shabd

DHVANI DARSHAK SHABD


ध्वनिदर्शक शब्द  [Dhvani Darshak Shabd] 

    या घटकावर प्रज्ञाशोध परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर इतर नोकरी भारती स्पर्धा परीक्षेसाठी या घटकावर प्रश्न विचारले जातात. काही वेळा आपणास हे मराठी ध्वनिदर्शक शब्द Matarhi Dhvani Darshak Shabd माहित नसल्याने आपले या घटकावरील गुण आपणास मिळू शकत नाहीत. या घटकाची तयारी होण्यासाठी आणि प्रश्नांचा सराव होण्यासाठी खालील टेस्ट आपणास उपयुक्त ठरेल.

 मराठी ध्वनिदर्शक शब्द Matarhi Dhvani Darshak Shabd


Monday, May 26, 2025

ghar darshak shabd / घरदर्शक शब्द

घरदर्शक शब्द 

ghar darshak shabd


Ghar Darshak Shabd

घरदर्शक शब्द Ghar Darshak Shabd या घटकावर आपणास अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नांची तयारी होण्यासाठी आपणास घरदर्शक शब्द या घटकाचा सराव होणे गरजेचे आहे. विशेषतः प्रज्ञाशोध परीक्षा तयारी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न विचारले जातात. नवोदय, TET, CTET EXAM व इतर परीक्षांमध्ये या घटकावर प्रश्न विचारले जातात. आपल्याला मराठी घरदर्शक शब्द Marathi Ghar Darshak Shabd या घटकाची तयारी नसल्याने गुण मिळू शकत नाहीत. 

आपली या घटकाची तयारी चांगली व्हावी यासाठी खालील टेस्ट उपयुक्त ठरेल.


   

Sunday, May 25, 2025

samuhdarshak shabd / समूहदर्शक शब्द

समूहदर्शक शब्द 

samuhdarshak shabd

समूहदर्शक शब्द म्हणजे काय ?

    समूहदर्शक शब्द म्हणजे असे शब्द की ज्या शब्दाने एखाद्या विशिष्ट पदार्थाच्या, प्राण्यांच्या किंवा घटकांच्या समूहाबद्दल आपणास माहिती समजते. जो शब्द ऐकल्यावर आपणास पदार्थाचा, प्राण्यांचा किंवा घटकांचा समूह आपल्या नजरेसमोर येतो अशा शब्दांना समूहदर्शक शब्द म्हणतात.
samuhdarshak shabd 


    आकाशात एकापेक्षा जास्त पक्षी एकत्र उडत असतील तर आपण त्या उडणाऱ्या पक्षांच्या समूहाला थवा म्हणतो.

    करवंदाच्या दाट झाडीला करवंदाची जाळी असे म्हणतात. असे अनेक समूहदर्शक शब्द आहेत. 

    या शब्दावर आधारित सराव टेस्ट खाली दिलेली आहे. आपणास प्रज्ञाशोध परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या टेस्टचा नक्कीच फायदा होईल.  

 


Friday, May 23, 2025

parimiti online test / परिमिती सराव टेस्ट

परिमिती सराव टेस्ट 

parimiti online test

परिमिती म्हणजे काय ? 

(parimiti kadhane)

parimiti online test


    परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज होय.

    एखाद्या आकृतीची परिमिती काढायची असेल तर त्या दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापाची बेरीज केली जाते.

    या सराव टेस्ट मध्ये आपण भौमितिक आकृत्यांची परिमिती या घटकावर आधारित प्रश्न सोडवणार आहोत. 

    परिमिती या घटकावरील शाब्दिक उदाहरणे सोडवण्याचा सराव व्हावा यासाठी खालील सराव टेस्ट उपयुक्त आहे.



 

Thursday, May 22, 2025

Vachan marathi grammar / वचन मराठी व्याकरण

वचन मराठी व्याकरण 

Vachan marathi grammar

वचन म्हणजे काय ?

वचन मराठी व्याकरण

खालील अधोरेखित शब्द पहा. 

एक नदी - अनेक नद्या 

एक पिशवी - अनेक पिशव्या 

एक पुस्तक - अनेक पुस्तके 

एक आंबा - अनेक आंबे

    वरील अधोरेखित नामामध्ये  'नदी, पुस्तक, पिशवी, आंबा' या नामावरून एका वस्तूचा बोध होतो, तर 'नद्या, पुस्तके, पिशव्या, आंबे' या नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो.

    "ज्या नामावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत हे कळते, त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात."  
मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत.  

१. एकवचन          २. अनेकवचन 


१. एकवचन :- नामावरून एकाच वस्तूचा बोध झाला, तर त्याला त्या नामाचे एकवचन म्हणतात.

२. एकवचन :- नामावरून अनेक वस्तूचा बोध झाला, तर त्याला त्या नामाचे अनेकवचन म्हणतात.

    वचन या घटकावर खाली सराव टेस्ट दिलेली आहे. प्रज्ञाशोध परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या सराव टेस्टचा उपयोग नक्कीच होईल.

 

Wednesday, May 21, 2025

parimiti shabdik udaharan / परिमिती शाब्दिक उदाहरणे.

parimiti shabdik udaharan 

परिमिती शाब्दिक उदाहरणे.

परिमिती म्हणजे काय ? 

(parimiti mhanje kaay ?)

               parimiti mhanje kaay ?


    परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज होय.

    एखाद्या आकृतीची परिमिती काढायची असेल तर त्या दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापाची बेरीज केली जाते.

    परिमिती या घटकावरील शाब्दिक उदाहरणे सोडवण्याचा सराव व्हावा यासाठी खालील सराव टेस्ट उपयुक्त आहे.

   

kalmapan in marathi / time / कालमापन (वेळ)

कालमापन

kalmapan in marathi


    आपण घड्याळ पाहिलं आहे आणि ते समजूनही घेतलं आहे. घड्याळामध्ये १ ते १२ असे अंक असतात. या घड्याळाला बरी तासाचे घड्याळ असे म्हणतात. पण काही ठिकाणी २४ तासाचे घड्याळ वापरले जाते. 

kalmapan in marathi


    घड्याळाच्या सहायाने आपण वेळेचे मापन करतो. घड्याळामुळे आपणास वेळ समजते. 

    घड्याळात तीन काटे पाहायला मिळतात. त्यात तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा असे हे तीन काटे असतात. यावरून आपण वेळ समजून घेतो. 

    कालमापन यामध्ये वेळेचे वाचन या घटकावरील खालील सराव टेस्ट सोडवा.

kalmapan  

apurnank online test / अपूर्णांक रंगवलेला व ना रंगवलेला भाग दाखवणे.

अपूर्णांक रंगवलेला व ना रंगवलेला भाग दाखवणे. 

apurnank

  आपण संख्या लेखन करतो. आपण ज्या संख्या पूर्णांक रुपात लिहित नाही त्या संख्यांना आपण अपूर्णांक असे म्हणतो. 


apurnank


    आपण ज्या संख्या पाव भाग, पाऊन भाग, अर्धा भाग त्याचबरोबर सव्वा, दीड याप्रमाणे लिहितो त्याला अपूर्णांकात केलेले लेखन असे म्हणतात.

    अपूर्णांक लेखन करतेवेळी त्यामध्ये अंश आणि छेद याप्रमाणे मांडणी केली जाते. 


उदा.    १४/२०

            या  अपूर्णांकाचे वाचन चौदा अंश छेद वीस असे केले जाते.


अपूर्णांकाचे वाचन व लेखन या घटकाचा सराव होण्यासाठी खालील सराव टेस्ट सोडवा.
 

Tuesday, May 20, 2025

apurnank in marathi / अपूर्णांकाचे वाचन - लेखन

अपूर्णांकाचे वाचन - लेखन 

 apurnank in marathi

apurnanak mhanje kaay ?

अपूर्णांकाचे वाचन - लेखन

अपूर्णांक म्हणजे काय ? 

    आपण संख्या लेखन करतो. आपण ज्या संख्या पूर्णांक रुपात लिहित नाही त्या संख्यांना आपण अपूर्णांक असे म्हणतो. 

    आपण ज्या संख्या पाव भाग, पाऊन भाग, अर्धा भाग त्याचबरोबर सव्वा, दीड याप्रमाणे लिहितो त्याला अपूर्णांकात केलेले लेखन असे म्हणतात.

    अपूर्णांक लेखन करतेवेळी त्यामध्ये अंश आणि छेद याप्रमाणे मांडणी केली जाते. 

उदा.    १४/२०

            या  अपूर्णांकाचे वाचन चौदा अंश छेद वीस असे केले जाते.


अपूर्णांकाचे वाचन व लेखन या घटकाचा सराव होण्यासाठी खालील सराव टेस्ट सोडवा.
 
      

shabdik udaharan berij / शाब्दिक उदाहरणे बेरीज

शाब्दिक उदाहरणे बेरीज 

shabdik udaharan berij

    संख्येवरील क्रिया या घटकामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आपण अभ्यासलो आहोत. यामध्ये बेरीज या घटकावर आधारित शाब्दिक उदाहरणे आपण आज पाहणार आहोत. 

shabdik udaharan berij


    बेरीज म्हणजे काय याबद्दल आपण माहिती पहिली आहे. एकत्र करणे, मिळवणे, वाढवणे याला आपण बेरीज असे म्हणतो. संख्या एकाखाली एक मांडून आपण त्या संख्येची बेरीज करतो. पण हीच उदाहरणे आपण शब्दात मांडणी केली, की त्या उदाहरणांना शाब्दिक उदाहरणे असे म्हणतात. 

    शाब्दिक उदाहरणे सोडवतेवेळी आपणास ती उदाहरणे समजून घेऊन वाचन करणे गरजेचे असते. 

    अशा शाब्दिक उदाहरणांचा सराव होण्यासाठी खालील सराव टेस्ट उपयुक्त आहे.

 

aathavadyache var marathi /Days Of Week In Marathi / आठवड्याचे वार

aathavadyache var marathi 

आठवड्याचे वार

    आठवडा किंवा साप्ताह हे कालमापनाचे एकक आहे. एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात. आपण दिनदर्शिका पहिली असेल . प्रत्येक आठवड्यात सात दिवस असतात. ते सात दिवस पुढीलप्रमाणे आहेत. १. रविवार २. सोमवार ३. मंगळवार ४. बुधवार ५. गुरुवार ६. शुक्रवार ७. शनिवार 

आठवड्याचे वार 

    प्रत्येक वार हा दर आठव्या दिवशी परत येतो त्यामुळे या चक्राला आठवडा असे म्हणतात.

    या आठवड्याच्या वारांवर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी खालील टेस्ट उपयुक्त आहे . 

Days Of Week

visheshan / marathi grammar / visheshan mhanje kaay / मराठी व्याकरण विशेषण

मराठी व्याकरण विशेषण 

visheshan / marathi grammar

विशेषण म्हणजे काय ? visheshan mhanje kaay ?


आपण यापूर्वी नाम, सार्वनाम या घटकाचा अभ्यास केलेला आहे. वाक्यात आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.

वाक्यातील विशेषण शोधण्यासाठी त्या वाक्यात असलेल्या नामाला कसा हा प्रश्न विचारला की आपणास त्या वाक्यातील विशेषण मिळते.

visheshan mhanje kaay ?


खालील उदाहरण अभ्यासू.

१. वर्गातील फळा काळा आहे.

या वाक्यातील विशेषण ओळखण्यासाठी आपण फळा या नामाला कसा हा प्रश्न विचारू .

म्हणजेच फळा कसा आहे ? 

याच उत्तर असेल फळा काळा आहे.

म्हणजे या वाक्यात फळा या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काळा हा आहे. म्हणून या वाक्यात काळा हा शब्द विशेषण आहे.

विशेषण या घटकाचा सराव होण्यासाठी खालील सराव टेस्ट उपयुक्त आहे.
 

sankhya malika / संख्यामालिका

संख्यामालिका

sankhya malika

sankhya malika

    'आकलन' या प्रश्नप्रकारामधील अंक किंवा संख्यांची मालिका दिलेली असते. या मालिकेचे लक्षपूर्वक निरीक्षण करावे लागते. मालिकेतील पदांची मोजदात करणे, मालिकेतील क्रमाने बदल होणाऱ्या संख्या, अटी पाळणाऱ्या संख्या शोधणे, संख्यांचा लहन-मोठेपणा,सम संख्या-विषम संख्या, संख्यांचे स्वरूप, संख्यावरील क्रिया करून येणाऱ्या संख्या असे विविध प्रकारचे प्रश्न विचारून आकलन क्षमतेचे मूल्यमापन केले जाते. संख्यामालिकेमध्ये सुचनापालनही करणे म्हत्वाचे आहे. 

sankhya malika

या घटकावर आधारित सराव टेस्ट खाली दिलेली आहे. टेस्ट सोडवा. 

संख्यांची मालिका

    

ling in marathi / grammar / मराठी व्याकरण लिंग

मराठी व्याकरण लिंग

ling in marathi

मराठी व्याकरण लिंग 


    नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुषजातीची आहे, की स्त्रीजातीची आहे, की ती वस्तू दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही, हे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग म्हणतात.
मराठी व्याकरनामध्ये लिंगाचे तीन प्रकार आहेत. 

१. पुल्लिंग 
२. स्त्रीलिंग 
३. नपुंसकलिंग

१. पुल्लिंग :- ज्या नामावरून ती वस्तू पुरुष जातीची आहे, असा बोध होतो त्याला पुल्लिंग असे म्हणतात.

पुल्लिंगी नाम ओळखण्यासाठी त्या नामापुढे 'तो' हा शब्द वापरतात. 

उदा. :-  तो मुलगा, तो टेबल, तो बैल इत्यादी.

२. स्त्रीलिंग :- ज्या नामावरून ती वस्तू स्त्री जातीची आहे, असा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात.

स्त्रीलिंगी नाम ओळखण्यासाठी त्या नामापुढे 'ती' हा शब्द वापरतात. 

उदा. :-  ती राधा, ती गाय, ती चिमणी इत्यादी.

३. नपुंसकलिंग :- ज्या नामावरून ती वस्तू स्त्री जातीची किंवा पुरुष जातीची आहे असे स्पष्ट समजत नाही, त्याला नपुंसकलिंग असे म्हणतात.
नपुंसकलिंगी नाम ओळखण्यासाठी त्या नामापुढे 'तो' हा शब्द वापरतात.

उदा. :- ते वासरू, ते बाळ, ते झाड इत्यादी.


 

Antarrashtriya Sankhya / आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे

आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 

Antarrashtriya Sankhya


आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 

    आपल्या देशातील राज्याची रचना ही भाषेनुसार झालेलेली आहे. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्यभाषेचा व्यवहारात उपयोग केला जातो. जेव्हा एका राज्यातील व्यक्ती दुसऱ्या राज्यात जातो, तेव्हा तेथील स्थानिकांशी आपला भाषिक व्यवहार करण्यासठी राष्ट्रभाषा वापरली जाते. त्याचप्रमाणे संख्येशी संबंधित जे व्यवहार आहेत, ते व्यवहार करण्यासाठी सर्वत्र एकाच प्रकारचे अंक वापरले जातात. 
    आपण नोटा , नाणी , गाडीचे नंबर प्लेट, विमानाचे तिकीट, बसचे तिकीट, सर्व प्रकारची वाहने यांवर इंग्रजी मध्ये क्रमांक लिहिलेले असतात. कोणत्याही राज्यात गेलात तर आपणास हे सगळे अंक इंग्रजी मध्ये पाहायला मिळतात. 

अंकांचे इंग्रजीतून केलेलं लेखन म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे होय. आपण जेव्हा अंक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 या अंकांचा वापर करून करतो, त्या संख्येला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे असे म्हणतात. 

    आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यावर आधारित खालील टेस्ट उपयुक्त ठरेल. दिलेली टेस्ट सोडवा.


 Antarrashtriya Sankhya

 

kriyapad in marathi / grammar / क्रियापद मराठी व्याकरण

क्रियापद मराठी व्याकरण 

kriyapad in marathi / vyakaran marathi

क्रियापद म्हणजे काय ? 

    वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या वाक्यातील क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
बहुतेकवेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येत असते. काही वाक्यामध्ये क्रियापद हे वाक्याच्या मध्येही येऊ शकते. 

kriyapad in marathi 


खालील उदाहरणे पाहू.

१. मी चित्र काढतो.

वरील वाक्यात काढतो या शब्दाचा विचार केला, तर या वाक्यात चित्र काढण्याची क्रिया आहे, हे आपणास समजते.

२. मी अभ्यास करतो.

वरील वाक्यात करतो या शब्दाचा विचार केला, तर या वाक्यात अभ्यास करण्याची क्रिया आहे, हे आपणास समजते.

३. मी क्रिकेट खेळतो.

वरील वाक्यात खेळतो या शब्दाचा विचार केला, तर या वाक्यात क्रिकेट खेळण्याची क्रिया आहे, हे आपणास समजते.

    यावरून ' काढतो, करतो, खेळतो' हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत. तसेच वाक्याचा आर्थ पूर्ण  करणारे शब्द आहेत. म्हणून 'काढतो, करतो, खेळतो' या वाक्याला क्रियापद असे म्हणतात.
    
    प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षा तयारी करण्यासाठी क्रियापद या घटकावरील खाली दिलेली सराव टेस्ट सोडवा.

Marathi Grammar     

Sunday, May 18, 2025

bhaumitik aakar parimiti kadhane / parimiti kadhane / भौमितिक आकारांची परिमिती

भौमितिक आकारांची परिमिती 

 bhaumitik aakar parimiti / parimiti kadhane

परिमिती म्हणजे काय ?

    आपण भौमितिक आकार म्हणजे काय याविषयी माहिती अभ्यासली आहे. भौमितिक आकारांमध्ये त्रिकोण, आयत, चौकोन, चौरस, पंचकोन, षटकोन, शंकू, वर्तुळ या आकारांना भौमितिक आकार म्हणतात. 

parimiti kadhane

    या आकारातील त्रिकोण, आयत, चौकोन, चौरस, पंचकोन, षटकोन अशा आकारांची आपण परिमिती काढतो. परिमिती काढणे म्हणजे दिलेल्या आकाराच्या ज्या बाजू असतात, त्या सर्व बाजूंच्या लांबीच्या मापाची बेरीज करणे होय. परिमिती ही बंदिस्त आकृतीची काढली जाते. 

    परिमिती काढण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो. 


    परिमिती या घटकाचा सराव होण्यासाठी खालील टेस्ट उपयुक्त आहे. 

 

Sarvanam in marathi / vyakaran / sarvnam marathi vyakaran / सर्वनाम / सर्वनाम मराठी व्याकरण

सर्वनाम मराठी व्याकरण 


Sarvanam in marathi / sarvnam marathi vyakaran


 सर्वनाम म्हणजे नामाबद्दल वाक्यात येणार शब्द होय. आपण वाचन, लेखन आणि बोलतेवेळी एखाद्या नामाचा परत परत येणारा उच्चार न करता त्या नामाबद्दल एखादा शब्द वापरतो. आपण नामाबद्दल जो दुसरा शब्द वापरतो त्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. 

Sarvanam in marathi

    मी, तू, तुम्ही, आपण, आम्ही, हा, ही, हे, तो, ती,ते हे आणि अशा इतर शब्दांना सार्वनाम म्हणतात. सर्वनामाचा वापर करतेवेळी नामाचे लिंग कोणते आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. नामाच्या लिंगानुसार सर्वनामाचा वापर होत असतो.

sarvnam marathi vyakaran

 प्रज्ञाशोध परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मराठी व्याकरण या घटकावर सार्वनाम यावर प्रश्न विचारला जातो. या घटकाचा सराव होण्यासाठी खालील टेस्ट आपणास उपयुक्त आहे.  

 
 

Friday, May 16, 2025

Marathi Grammar Test nam / Marathi Vyakaran nam / मराठी व्याकरण - नाम

Marathi Grammar Test 

marathi vyakaran test 

Marathi Vyakaran nam 

मराठी व्याकरण - नाम


    प्रज्ञाशोध परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरण हा घटक महत्वाचा आहे. मराठी व्याकरण या घटकामध्ये येणारा नाम  हा घटक आपण अभ्यासला आहे. नाम म्हणजे काय ? याबद्दल आपण माहिती घेतली आहेच. 
    नाम या घटकाबद्दल थोडक्यात माहिती आपण बघू.

Marathi Vyakaran nam 


   नाम :- कोणत्याही दृश्य ( दृश्य म्हणजे  ज्या वस्तू आपल्या डोळ्याला दिसतात  ) - अदृश्य ( अदृश्य म्हणजे ज्या वस्तू आपल्या डोळ्याला दिसत नाहीत ), सजीव - निर्जीव वस्तूच्या नावाला आपण नाम असे म्हणतो. Marathi Vyakaran nam 


यामध्ये ,

 
    पक्ष्यांची , पशूंची , फुलांची , फळांची , पर्वतांची , नद्यांची , मुलांची , मुलींची , देशांची , धान्यांची , ग्रह , नक्षत्र व ताऱ्यांची नावे ,काल्पनिक नावे , गुणांची , मनाची स्थितीची , ऋतूंची नावे  अशा  वस्तूंच्या नावाला  नाम असे म्हणतात. 

नाम या घटकावरील खालील टेस्ट सोडवा.
 
 

bhaumitik aakar online test / भौमितिक आकृत्या

भौमितिक आकृत्या - कोन 

 bhaumitik aakar online test

भौमितिक आकृत्या - गणित या विषयातील महत्वाचा घटक म्हणजे भौमितिक आकृत्या हा पण आहे. आपण भौमितिक आकारांची ओळख या आधी करून घेतली आहे. भौमितिक आकृत्यांमध्ये कोन हा घटक आपण शिकलो आहोत. कोनाचे मुख्य तीन प्रकार आपण अभ्यासले आहेत. त्यामध्ये विशालकोन, काटकोन आणि लघुकोन असे तीन प्रकार आहेत.

bhaumitik aakar



१. विशालकोन :- विशाल कोन कोणत्या कोनाला म्हणतात ?

                         'ज्या कोनाचे माप हे ९० अंशापेक्षा जास्त असते, त्या कोनाला  विशालकोन असे म्हणतात.'

२. काटकोन :- काटकोन कोणत्या कोनाला म्हणतात ?

                        'ज्या कोनाचे माप हे ९० अंश असते, त्या कोनाला  काटकोन असे म्हणतात.'

३. लघुकोन :- लघुकोन कोणत्या कोनाला म्हणतात ?
 
                        'ज्या कोनाचे माप हे ९० अंश पेक्षा कमी असते, त्या कोनाला  लघुकोन असे म्हणतात.'

वरील प्रमाणे कोन व कोनाचे प्रकार आहेत. या घटकावर आधारित ऑनलाईन सराव टेस्ट खाली दिलेली आहे. 

 bhaumitik aakar online test

 

Thursday, May 15, 2025

sankhya che vistarit roop / संख्याचे विस्तारित रूप

संख्याचे विस्तारित रूप 

sankhya che vistarit roop

sankhya che vistarit roop


    आपण ह्या संख्या लेखन आणि वाचन करतो, त्या संख्येतील अंकाच्या स्थानानुसार त्या अंकांच्या किंमती ठरत असतात. या अंकांच्या स्थानिक किंमती कशा काढायच्या हे आपण शिकलो आहोत. अंकांच्या स्थानिक किंमतीवरून आपण त्या संख्येचे विस्तारित रूप लेखन शिकलो आहोत. 

    संख्याचे विस्तारित रूप - संख्येतील अंकांच्या स्थानिक किंमती या बेरजेच्या रुपात मांडणी करणे, यालाच आपण संख्येचे विस्तारित रूप लिहिणे असे म्हणतो.


उदा. - ५३४२ = ५००० + ३०० + ४० + २ 
            
            ६१२ = ६०० + १० + २  
            
            ४३६७ = ४००० + ३०० + ६० + ७ 

वरीलप्रमाणे आपण संख्येची विस्तारित रुपात मांडणी करतो.

sankhya che vistarit roop


Wednesday, May 14, 2025

sthanik kimat darshani kimat online test / स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत

स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत 

Sthanik Kimat Darshani Kimat Online Test

Sthanik Kimat Darshani Kimat Online Test


    आपण संख्या वाचन व लेखन शिकलो आहे. संख्या लेखन करतेवेळी आपण जे अंक लिहितो त्या प्रत्येक अंकाला दोन प्रकारच्या किंमती असतात. संख्येतील अंकांना त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत अशा दोन किंमती असतात.

स्थानिक किंमत म्हणजे काय ?


    आपण ज्या संख्या लिहितो, त्या संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान ठरलेले आहे. त्या स्थानानुसार त्या अंकाची स्थानिक किंमत ठरते. संख्या लेखन करतेवेळी आपण एकक , दशक , शतक , हजार अशा प्रकारे स्थानाचा वापर करून संख्या लेखन करतो. एखादा अंक कोणत्या स्थानावर आहे त्यानुसार त्या अंकाची स्थानिक किंमत ठरते.

दर्शनी किंमत म्हणजे काय ?


प्रत्येक संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही तीच असते. 
उदा. २५४ या संख्येतील ५ या अंकाची स्थानिक किंमत ५ आहे. 
        ७५६ या संख्येतील ७ या अंकाची स्थानिक किंमत ७ आहे.

स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या घटकाचा परिपूर्ण सराव होण्यासाठी खालील सराव टेस्ट उपयुक्त आहे.


 

saman arthache shabd online test समानार्थी शब्द सराव चाचणी

समानार्थी शब्द सराव चाचणी saman arthache shabd online test saman arthache shabd online test    saman arthache shabd online test      आपल्या...