२.संतांची कामगिरी
 |
| santanchi kamgiri |
santanchi kamgiri
महाराष्ट्रात समाजाच्या विविध स्तरांमध्ये अनेक संत होऊन गेले. यात जनाबाई, सोयराबाई, निर्मलाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई या स्त्री संतांचाही सामावेश होतो. या सर्वच संतांनी लोकांनी दया, अहिंसा, समभाव, सेवा यांची शिकवण दिली.
महाराष्ट्रातील संत
महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यात श्रीचक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत शेख महंमद, संत तुकाराम, संत निळोबा या संतांचा अंतर्भाव आहे.
संतांचे उपदेश व कार्य
महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांनी लोकांना अहिंसा, परोपकार, बंधुभाव, समता, सेवा या गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकाच्या मनात निर्माण केली.
साधुसंतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला.
या पाठावरील महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
पाठातील महत्वाच्या प्रश्न आणि उत्तरांचा व्हिडीओ येथे पाहा.